शेतकऱ्यांसाठी खुशखबर : नव्या प्रजातीचे ऊस बियाणे देणार जादा उत्पादन

लखनौ : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संशोधकांनी मोठा दिलासा दिला आहे. सेवरही ऊस संशोधन संस्थेने सामान्य प्रजातीचे असे ऊस बियाणे तयार केले आहे की, जो ऊस वाळणार नाही किंवा पडणारही नाही. एवढेच नाही तर या बियाण्यापासून एक एकरातील उत्पादन ४०० प्रती क्विंटल आणि साखर उताराही चांगला आहे. सध्या रेड डॉट रोगामुळे कोसा २३८ व २३९ या बियाण्यांवर निर्बंध लागू केले आहेत. या बियाण्याचे उत्पादन आणि उताराही चांगला होता. नोव्हेंबर महिन्यात या बियाण्यापासून नोव्हेंबर महिन्यात १० पेक्षा अधिक उतारा मिळत होता.

लाईव्ह हिंदूस्थानमधील वृत्तानुसार, ऊस संशोधन केंद्र पिपराईचचे सहाय्यक संचालक ओमप्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, आधी बीओ ९१ आणि नंतर ९२४२३ तसेच २३८ व २३९ या प्रजातीला प्राधान्य दिले जात होते. मात्र, लाल सड रोगामुळे ही प्रजाती बंद होत आहे. आता बाबू गेंदा सिंह ऊस संशोधन केंद्र सेवरहीच्या संशोधकांनी कोसी ११४५३ या नव्या प्रजातीचे बियाणे तयार केले आहे. त्याचे उत्पादन कोसी २३८ व २३९ या प्रजातीपेक्षा ४०० क्विंटल प्रती एकर अधिक आहे. याशिवाय नोव्हेंबरमध्ये याचा साखर उतारा ११.७ तर मार्च महिन्यात १३.४५ इतका आहे. याशिवाय १३४५२ ही दुसरी व्हरायटी प्रती एकर ३५० ते ४०० क्विंटल उत्पादन देईल. त्याचा उताराही नोव्हेंबर आणि मार्चमध्ये अनुक्रमे ११.७२ आणि १४ इतका आहे. हा ऊस वाळत नाही तसेच पडतही नाही. शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here