“थकबाकीदार शेतकऱ्यांनाही पिककर्ज मिळणार”

मुंबई : ज्या शेतकऱ्याना थकबाकीमुळे पीककर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या अशा शेतकऱ्यांनाही आता कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवाडे यांनी सांगितले आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वर्धापन दिनानिमित्त बॅंकेच्या मुख्यालयात मोबाईल व्हॅन सेवेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

ते म्हणाले, राज्य सरकारने कमी वेळेत आणि कमी त्रासात शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविली आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्तीबरोबरच, येत्या खरीप व रब्बी हंगामासाठी त्याला सहजरित्या कर्जपुरवठा हि उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यादृष्टीनेही सरकार पावले उचलत आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पुढील टप्प्याला लवकरच सुरवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी बॅंकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे, शहर उपनिबंधक नागनाथ कंजिरे उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here