मुंबईकरांना खुशखबर, कोरोनाचे निर्बंध लवकरच हटणार

मुंबई : गेल्या महिनाभरापासून मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे अनेक निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लवकरात लवकर शहरातील निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. एका पत्रकार परिषदेत पेडणेकर यांनी ही माहिती दिली.

महापौर म्हणाल्या, मुंबईकरांसाठी ही खुशखबर आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई अनलॉक होईल. आम्ही निर्णय घेतला आहे. मात्र, त्यानंतरही लोकांना मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. दरम्यान, आता मुंबईत कोरोनाची तिसरी लाट संथ झाली आहे. नव्या रुग्णांचे प्रमाण घटले आहे. सोमवारी शहरात ५०० हून कमी रुग्ण आढळले. गेल्या ३९ दिवसांत ही कमी रुग्णसंख्या आहे. सोमवारी ३५६ रुग्ण आढळले. २१ डिसेंबर २०२१ नंतर दैनंदिन सर्वात कमी संख्या आहे. जेव्हा तिसरी लाट सुरू झाली होती, तेव्हा मुंबईत ३२१ रुग्ण आढळले होते. सोमवारी पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here