ऊस शेतकर्यां साठी खुशखबर, गोवा सरकार देणार ५.२३ करोड रुपये

116

पणजी :गोवा सरकारने ऊस शेतकऱ्यांना सपोर्ट प्राईज म्हणून ५.२३ करोड रुपये देण्याची घोषणा केली आहे. बुधवार पासून उसगाव येथे संजीवनीसाखर कारखान्यावर अनिश्चित काळासाठी शेतकरी उपोषणाला बसले होते, या नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शेतकऱ्यांची भेट घेण्याचे आश्वासन दिले,त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला, मुख्यमंत्री सावंत यांनी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कावळेकर व सहकार मंत्री गोविंद गावडे यांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या बैठकी मध्ये सांगितले कि सरकार सपोर्ट प्राईस म्हणून ५.२३ करोड रुपये शेतकऱ्यांना देईल, या वेळी सहकार मंत्री गावडे म्हणाले कि प्रति टन १८०० रुपये शनिवार पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील. मंत्र्यांनी सांगीतले कि ऊस तोडणी साठी शेतकर्यां कडून प्रति टन ६०० रुपयांची मागणी आहे जे पुढील काळात दिले जातील, दक्षिण आणि उत्तर गोवा मध्ये जवळपास ८०० ऊस शेतकरी आहेत गोव्यामध्ये प्रतिवर्षी ३०,००० हजार मेट्रिक टॅन ऊसाचे उत्पादन होते. २०१८ पर्यंत या ऊसाचे गाळप सरकार मार्फत केले जात होते या नंतर कारखाना दुरुस्तीमुळे बंद करण्यात आला कारखाना बंद असल्यामुळे ऊस गाळपासाठी कर्नाटकामध्ये पाठवण्यात आला, गावडे यांनी सांगितले कि संजीवनी कारखाना लवकरच चालू केला जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here