करदात्यांसाठी खुशखबर, आयकर विभागा व्याज, लेट फी परत करणार

नवी दिल्ली : सॉफ्टवेअरमधील गोंधळामुळे २०२०-२१ मध्ये आयकर रिटर्न भरताना करदात्यांकडून घेतले गेलेले व्याज आणि विलंब शुल्क परत दिले जाणार आहे असे आयकर विभागाने स्पष्ट केले. कोरोना महामारीच्या काळात करदात्यांना दिलासा देण्यासाठी गेल्यावर्षी आयकर रिटर्न भरण्याची मुदत ३१ जुलै २०२१ वरून वाढवून ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली होती. मात्र, ३१ जुलै २०२१ नंतर भरलेल्या आयकर रिटर्नवर व्याज आणि विलंब शुल्क लावले गेले आहे अशी तक्रार अनेक करदात्यांनी केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

आयकर विभागाने ट्वीटरवरून दिलेल्या माहितीनुसार आयकर अधिनियम कलम २३४ ए अनुसार व्याज आणि कलम २३४ एफ नुसार विलंब शुल्क आकारणी करण्यात आलेली त्रुटी दूर करण्यासाठी आयटीआर सॉफ्टवेअर एक ऑगस्ट रोजी बदल करण्यात आला आहे. करदात्यांनी आयटीआर सॉफ्टवेअरच्या नव्या प्रक्रियेचा वापर करावा अथवा रिटर्नबाबतची प्रक्रिया ऑनलाईन करावी. जर कोणाकडून चुकीच्या पद्धतीने व्याज, दंडासह आयटीआर जमा केले गेले असेल तर सीपीसी-आयटीआरवर त्याची योग्य आकारणी केली जाईल. आणि अतिरिक्त रक्कम वजा करण्यात येणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here