खुशखबर: पंजाब सरकारकडून ऊस दरात प्रती क्विंटल १५ रुपयांची वाढ

पंजाब सरकारने ऊसाच्या दरात १५ रुपये प्रती क्विंटलची वाढ केली आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ऊसाच्या सर्व प्रजातींच्या दरात १५ रुपये प्रती क्विंटलची वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. गाळप हंगाम २०२१-२२ साठी ही वाढ करण्यात आली आहे.

पंजाबमध्ये आता उसाच्या अग्रणी प्रजातीची किंमत ३१० रुपयांवरुन ३२५ रुपये, मध्यम प्रजातीचा दर ३०० रुपयांवरुन ३१५ रुपये आणि आडसाली उसाची किंमत २९५ रुपयांवरुन ३१० रुपये प्रती क्विंटल करण्यात आली आहे. गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये राज्यभरात ऊस क्षेत्र १.१० लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. ज्यामध्ये साखर कारखान्यांकडून साधारणतः ६६० लाख क्विंटल उसाचे गाळप केले जाणार आहे. उसाच्या दरात वाढ झाल्याने पंजाबमधील शेतकऱ्यांना २३० कोटी रुपयांचा लाभ होईल. मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला उसाचे लागवड क्षेत्र वाढवण्यासह शेतकऱ्यांसोबत काम करण्यास आणि साखर कारखान्यांच्या गाळप क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या आहेत.

ऊस नियंत्रण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना मुख्यमंत्र्यांनी सहकार मंत्री सुखजिंदर सिंह संधावा यांच्या नेतृत्वाखाली ऊस विकास विभागाची स्थापना केली. यामध्ये राणा शुगरचे सीएमडी राणा गुरजित सिंह, पंजाब राज्य शेतकरी आयोगाचे चेअरमन अजयवीर जाखड, ऊस आयुक्त गुरविंदर सिंह आणि पंजाब कृषी विद्यापीठाचे कपूरथला येथील ऊस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. गुलजार सिंह यांचा समावेश आहे. उसाचे उत्पादन वाढविण्यासह आधुनिक प्रणालीचा वापर करण्यासाठी हा विभाग प्रयत्न करणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा</span
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here