पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी इथेनॉल खरेदीच्या निविदेला चांगला प्रतिसाद: सरकारचा दावा

56

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याबाबत पेट्रोलियम कंपन्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांना पेट्रोल मिश्रणासाठी इथेनॉल खरेदी करण्यासाठी जारी करण्यात आलेल्या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सरकारकडून ही माहिती देण्यात आली. आगामी काळात इथेनॉल यंत्रणेसह इथेनॉल पुरवठ्याच्या दीर्घकालीन करारावर स्वाक्षरीच्या आधी ईओआयसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १९७ जणांनी यात सहभाग घेतल्याचे सरकारने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (बीपीसीएल) पेट्रोलियम वितरण कंपन्यांकडून २७ ऑगस्ट रोजी पहिल्यांदा ईओआयची मागवली होती. १७ सप्टेंबर रोजी या निविदा उघडण्यात आल्या. त्याबाबतची पडताळणी सुरू आहे. पेट्रोलियम कंपन्यांना पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण (ब्लेंडिंग) हळूहळू वीस टक्के करण्याच्या हेतूने इथेनॉल खरेदी करण्यासाठी निविदा जारी केली होती.

याबाबत निवेदनात म्हटले आहे की, इथेनॉल पुरवठा वर्ष डिसेंबर २०१९-नोव्हेंबर २०२० या कालावधीत १७३ कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्यात आले. या काळात पाच टक्के इथेनॉल मिश्रणाचा टप्पा गाठला गेला. २०२०-२१ या काळात ३२५ कोटी लिटर इथेनॉल खरेदी करण्याचे उद्दीष्ट आहे. या कालावधीत ८.५ टक्क्यांची उद्दिष्ट गाठले जाईल. आतापर्यंत या वर्षात २४३ कोटी लिटर इथेनॉल खरेदी करून ८.०१ टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट गाठले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here