महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात चांगले साखर उत्पादन

पुणे : चीनी मंडी

साखर हंगामाच्या पहिल्या टप्प्यात देशात साखर उत्पादन कमी झाल्याचे दिसत असले तरी, महाराष्ट्रात या काळात चांगले साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात राज्यात १६० साखर कारखान्यांचे गाळप सुरू होते. त्यातून ३ लाख २६ हजार टन साखर उत्पादन झाले होते. यंदा मात्र, १०८ साखर कारखाने सुरू असूनही या काळात सहा लाख ३१ हजार टन साखर उत्पादन झाले आहे.

देशात यंदा साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू झाला. त्यानंतर महिनाभरात देशात ११ लाख ६३ हजार टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी याच काळात १३ लाख ७३ हजार टन साखर उत्पादन झाले होते. या वर्षी उत्पादन कमी होण्यामागे महाराष्ट्रात काही भागातील दुष्काळी स्थिती, उसावरील हुमणी आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव तसेच ऊस दर आंदोलनामुळे रेंगाळलेले गाळप ही कारणे असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षीच्या साखर हंगामात देशात एकूण ५२७ साखर कारखाने गाळप करतील, अशी अपेक्षा आहे. १५ नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण २३८ साखर कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष गाळप सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here