सासामुसा साखर कारखाना बंद

कुचायकोट(गोपालगंज) : असा आरोप आहे की, सासामुसा येथील सासमुसा शुगर वर्क्स चे संचालक प्रजासत्ताक दिना दिवशी साखर कारखाना बंद करुन फरारी झाले. यामुळे हजारो शेतकऱ्यांचे ४० करोड रुपयांपेक्षा अधिक ऊस थकबाकीचे पैसे अडकले आहेत. कारखाना बंद झाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांना आपला ऊस तोडणी संदर्भात समस्या निर्माण झाली आहे. या कारखान्यात काम करणाऱ्या चारशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांसमोर रोजगारीचे संकट उभे आहे. कारखाना बंद करुन संचालक फरारी झाल्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी कारखाना गेटवर एकच आक्रोश केला.

गेल्या आठवड्यात कारखान्याचे संचालक महमूद अली अचानक कारखाना बंद करुन कारखाना परिसरातून गायब झाले होते. त्यावेळी कारखाना बंद होण्यावर कारखाना मजूर आणि शेतकऱ्यांनी कारखाना गेटवर निषेध केला होता. दुसऱ्या दिवशी कारखाना व्यवस्थापनाशी संबंधीत साजिद अली कारखान्यात आले आणि त्यांनी शेतकऱ्यांना कारखाना चालू राहण्याचा विश्वास दिला. त्यांनी थकबाकी बाबतही शेतकऱ्यांना आश्वासन दिले, त्यानंतर कारखाना सुरु झाला. पण प्रजासत्ताक दिनाला सकाळी अचानक कारखाना बंद करुन साजिद अली कुटुंबासह फरारी झाले. कारखाना बंद केल्यावर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क झाला नाही.

कारखाना कर्मचाऱ्यांनी सांगितले की, २०१२ नंतर कारखाना मजूर आणि कर्मचाऱ्यांचे १२ करोडपेक्षा अधिक देय व्यवस्थापनावर बाकी आहे. हजारो शेतकऱ्यांचे ४० करोडपेक्षाही अधिक देय बाकी आहे. जोपर्यंत कारखाना चालू केला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहिल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here