लखनौ : सध्याच्या जिल्हा योजना अंतर्गत ऊस पिकासाठी दोन योजनांमध्ये अनुदानाची व्यवस्था आहे. भूमी बिज उपचार योजनेअंतर्गत लागणीवेळी बिज प्रक्रियेवेळच्या औषधांवर ५० टक्के अथवा ५०० रुपये प्रती हेक्टर अनुदान दिले जाते. याशिवाय खोडवा पिकासाठीच्या किटकनाशकांसाठी ५० टक्के अथवा १५० रुपये प्रती हेक्टर अनुदान देण्यात येते. यामध्ये वाढ करण्यात येत असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे ऊस तथा साखर आयुक्त संजय भुसरेड्डी यांनी दिली. २०१२ पासून या दोन योजनांसाठी अनुदानाची व्यवस्था प्रचलित आहे. बाजारात अनेक नवीन किटकनाशके आली आहेत. शिवाय आधीपासून असलेल्या किटकनाशकांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदान वाढवावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती, असे आयुक्त भुसरेड्डी यांनी सांगितले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकारकडून अनुदान वाढीला मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या ऊस लागणीपासून खोडवा व्यवस्थापनापर्यंत सर्व ठिकाणी उपयुक्त ठरेल यासाठीच्या किटकनाशकांच्या खर्चावर ५० टक्के अथवा ९०० रुपये प्रती हेक्टर अनुदान उपलब्ध होणार आहे. ही किटकनाशके केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त रसायनांच्या सुचीमधीलच असली पाहिजेत, अथवा केंद्र सरकारकडून त्यावर निर्बंध लागू केलेले नसावेत, असे निकष यासाठी लागू करण्यात आलेला आहे.
यासोबतच बियाणे तथा जमीन वापरासाठी तथा ऊस व्यवस्थापन कार्यक्रमात विविध प्रकारच्या अनुदानाची व्यवस्था संपवून जास्तीत जास्त ९०० रुपये प्रती हेक्टर खर्च देण्यात येणार आहे. त्यामुळे अन्न सुरक्षेच्या हेतूने कोणताही शेतकरी किटकनाशकांचा ऊस लागवड व पिक व्यवस्थापन तसेच इतर वेळेही याचा वापर करू शकतात. राज्य सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयात तथा अनुदानात वाढ केल्याने ऊस पिकात सुरक्षेच्या उपाय योजनांना गती मिळेल. तसेच ऊसाच्या उत्पादनात वाढीसह शेतकऱ्यांचा ऊसावरील उत्पादन खर्चही कमी होवू शकेल.