नवी दिल्ली : केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनात प्रोत्सहन देण्यासाठी हरेक प्रयत्न सुरू केले आहेत. आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी या प्रयत्नांतून सरकारने ३१ मे २०२२ पर्यंत ७१ इथेनॉल उत्पादन योजनांना (Ethanol production projects) सैद्धांतिक मंजूरी (in-principle approval) देण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देत शेतकऱ्यांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. पेट्रोलियम उत्पादनांच्या तुलनेत इथेनॉलची किंमत कमी आहे. आणि याचे उत्पादन तांदूळ, गहू, उसाच्या रसापासूनही केले जावू शकते. यातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुधारणा होईल. व्याज सवलतीच्या योजनेतील नव्या एक खिडकी योजनेंतर्गत (New Window of Interest Subvention Scheme) यास मंजुरी दिली आहे. तर बायोफ्यूएल पॉलिसीतील बदलास कॅबिनेटने दिलेल्या मंजुरीनंतर सरकारने २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दीष्ट २०३० ऐवजी २०२५ पर्यंत केले आहे.