बांगलादेशमध्ये साखरेच्या दरात सरकारकडून कपात

ढाका : सरकारने गुरुवारी किरकोळ स्तरावर साखरेची किंमत Tk३ प्रती किलोने घटवून Tk १०४ प्रती किलो केली आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. नव्या किमती ९ एप्रिलपासून लागू होणार आहेत. गुरुवारी वाणिज्य मंत्रालयाने एक नोटीस जारी केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, रविवारपासून किरकोळ स्तरावर पॅकिंग न केलेल्या साखरेची किंमत Tk१०४ टका प्रती किलो आणि पॅकिंग केलेली साखर Tk १०९ प्रती किलो दराने विक्री केली जाईल.

सरकारचा हा निर्णय रिफायनरींना राष्ट्रीय महसूल बोर्डद्वारे कच्ची व प्रक्रियाकृत साखरेवरील आयात शुल्कात कपातीच्या दोन आठवड्यानंतर जारी झाला आहे. २६ फेब्रुवारी रोजी सरकारने सीमा शल्क मागे घेतला आणि साखरेच्या पुरवठ्यात सुधारणा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती नियंत्रित करण्यासाठी साखरेच्या आयातीवरील नियामक शुल्कात ३० टक्क्यांवरुन कपात करून ते २५ टक्क्यांवर आणण्यात आले.

NBR ने तत्काळ प्रभावाने एक टन कच्ची साखर आयारीवर Tk ३,००० विशिष्ट शुल्क आणि रिफाइंड साखरेवर Tk ६,००० मागे घेतले आहे. वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, त्यांनी १९ मार्च रोजी एका टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार साखरेच्या किमतींचे समायोजन केले आणि रिफायनरींना २७ मार्च रोजी साखरेच्या किमतींचा आढावा घेण्यास सांगण्यात आले. पुरवठ्यातील कमीमुळे जानेवारी महिन्यापासून देशातील साखरेची बाजारपेठ अस्थिर झाली आहे. पॅकेज्ड साखरेच्या किंमत स्थानिक बाजारपेठेत Tk१३० प्रती किलोपेक्षा अधिक आहे. तर सरकारने बांगलादेश शुगर रिफायनर्स असोसिएशनला एक फेब्रुवारीपासून किंमत Tk४ ने वाढवून Tk११२ प्रती किलो करण्यास परवानगी दिली होती. राजधानी ढाकातील किरकोळ बाजारात गुरुवारी साखरेची ११२-११५ टका प्रती किलो विक्री दराने केली जात होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here