नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सरकारचे अभिनंदन केले. एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय हा सरकारच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या ध्येयाचा निदर्शक आहे असे नड्डा यांनी सांगितले.
नड्डा यांनी याबाबत ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, एमएसपी वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला. हा निर्णय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा दृढ संकल्प दर्शवितो. या निर्णयाबद्दल मी सरकारला धन्यवाद देतो.
आर्थिक विषयांच्या मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) बुधवारी खरीप हंगाम २०२१-२२ यासाठी सर्व पिकांच्या किमान समर्थन मुल्यामध्ये (एमएसपी) वाढीला मंजुरी दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एमएसपीमध्ये सर्वोच्च वाढीने तिळ ४५२ रुपये प्रती क्विंटल करण्यात आले आहे. तर तूर आणि उडीद यांचा दर ३०० रुपये क्विंटल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.