केंद्र सरकारकडून मे 2020 साठी 17 लाख टन साखरेचा विक्री कोटा जाहीर

नवी दिल्ली : 29 एप्रिल च्या आधिसूचनेमध्ये सरकार च्या खाद्य मंत्रालयाने मे साठी देशाच्या 545 कारखान्यांना साखर विक्रीच्या 17 लाख टन कोट्याचे वाटप केले आहे.

मे 2020 साठी वाटप केलेला कोटा मे 2019 च्या महिन्याच्या कोट्यापेक्षा 4 लाख टन कमी आहे. यावेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत कमी साखरेचे वाटप करण्यात आले आहे. खाद्य मंत्रालयाकडून एप्रिल 2020 साठी 18 लाख टन साखर विक्री कोट्यास मंजूरी देण्यात आली होती.

देशभरामध्ये लॉकडाउनमुळे साखर कारखाने मार्च आणि एप्रिल 2020 साठी वाटप केलेल्या साखर कोटा विक्रीसाठी बरीच मेहनत घेत आहेत, कारण बाजारात साखरेेची मागणी कमी आहे. कोरोनाच्या फैलावामुळे ही साखर कारखान्यांच्या पुरवठा शृंखलेवर परिणाम झाला आहे. यामुळे सरकारने काढलेल्या आदेशामध्ये एप्रिल 2020 साठी वाटप केलेल्या साखरेच्या कोट्याची मुदत 31 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. साखर विक्रीमध्ये घट झाल्यामुळे कारखान्यांसमोर महसूल देयत्वाची गंभीर समस्या उभी आहे. भारतात घरगुती वापरासाठी साखरेची विक्री होत आहे, आणि मिठाई, फार्मासीटिकल्स आणि पेय पदार्थांमध्ये देखील साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सध्या, लॉकडाउन मुळे हे सर्व उद्योग बंद आहेत. उन्हाळ्याच्या सु़रुवातीनंतर कोल्ड्रींक्स, मिठाई सह इतर गोष्टींसाठी साखरेला चांगली मागणी असते. आता सगळीकडे लॉकडाउन आहे, यामुळे साखरेची विक्री ठप्प झाली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here