Ethanol Price : सरकारने इथेनॉलची किंमत वाढवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीने या इथेनॉल पुरवठा वर्ष, ईएसवाय 2022-23 दरम्यान, एक डिसेंबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 या आगामी 2022-23 च्या साखर हंगामासाठी विविध ऊस आधारित कच्च्या मालापासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या उच्च दराला मंजुरी दिली आहे :

  • सी हेवी मळीपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलीटर 46.66 रुपयांवरून प्रतिलीटर 49.41 रुपये वाढ करण्यात आली आहे,
  • बी हेवी मळीपासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलीटर 59.08 रुपयांवरून प्रतिलीटर 60.73 रुपये वाढ करण्यात आली आहे,
  • ऊसाचा रस/ साखर/ काकवी यांच्यापासून मिळणाऱ्या इथेनॉलच्या दरात प्रतिलीटर 63.45 रुपयांवरून प्रतिलीटर 65.61 रुपये वाढ करण्यात आली आहे.

त्याव्यतिरिक्त जीएसटी आणि वाहतूक आकार देय असेल.

सर्व डिस्टिलरींना या योजनेचा लाभ मिळवता येईल आणि त्यांच्यापैकी बऱ्याच कंपन्यांकडून ईबीपी, इथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रमासाठी इथेनॉलचा पुरवठा होईल अशी अपेक्षा आहे. इथेनॉल उत्पादकांना त्यांची भरपाई पुरेशा प्रमाणात मिळाल्यामुळे इथेनॉल पुरवठादारांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लवकर पैसे देता येतील ज्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या कमी होण्यासाठी मदत होईल.

सरकार इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रम राबवत आहे तर तेल विपणन कंपन्या 10% पर्यंत इथेनॉल मिसळून पेट्रोलची विक्री करत आहेत. या कार्यक्रमाचा 1 एप्रिल 2019 पासून अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप वगळता संपूर्ण भारतभर विस्तार करण्यात आला आहे. पर्यायी आणि पर्यावरण स्नेही इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा यामागचा उद्देश आहे. या निर्णयामुळे आयातीमध्ये कपात होईल आणि कृषी क्षेत्राला चालना मिळेल.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here