स्वयंपाकात वापरलेल्या तेलाचे रुपांतर बायोडिझेलमध्ये होणार

इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल कंपन्यांनी दि. 10 ऑगस्ट रोजी देशभरातील 100 शहरांमध्ये स्वयंपाकात वापरल्या गेलेल्या तेलापासून बायोडिझेल बनवण्याचा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले. या अंतर्गत तीन ओएमसी खासगी संस्थांनी याउपक्रमाबाबत रस दाखवला. सुरुवातीला ओएमसी कडून प्रति लिटर 51 रुपये दराने बायोडिझेल खरेदी केले जाईल, जे दुसर्‍या वर्षी 52.7 रुपये आणि तिसर्‍या वर्षी प्रति लिटर 54.5 रुपये इतके होइंल.

कुकिंग ऑइल पुन्हा पर्यावरणाकडे परत येवू नये या उद्देशाने मंत्र्यांनी रिपर्पोज युज्ड कुकिंग ऑईल (आरयूसीओ) स्टिकर आणि वापरलेले ककिंग ऑईल (यूसीओ) संग्रहित करण्यााठी मोबाइल अ‍ॅपही सुरु केले आहे. शिवाय ते बायोडिझेल उत्पादनासाठी यूसीओ पुरवतात हे दर्शवण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंटच्या आवारात हे स्टिकर चिटकवले जाईल.

वर्ल्ड बायोफ्यएल डे म्हणून आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रधान म्हणाले, बायोडिझेल वापरल्या जाणार्‍या स्वयंपाकाच्या तेलाशिवाय इतर प्रकारात उपलब्ध आहे. ती संपत्ती वाया जात आहे. आम्ही जागतिक जैवइंधन दिन वैकल्पिक उर्जा दिन म्हणून साजरा करु.

अमूलप्रमाणेच जिथे घरामधून दूध संकलित केले जाते आणि नंतर त्याचे व्यावसायिक उत्पादनात रुपांतर होते, ती रुको चळवळ होईल, ऑफ टेक गॅरंटीची सर्वात मोठी समस्या होती. कॉम्प्रेस्ड बायोगॅस साठी 300 हून अधिक कंपन्यांना लेटर ऑफ इंटंट मिळाला आहे. त्याची अंमलबजावणी करणे हे एक आव्हान आहे. परंतु 2024 पर्यंत आमचे 500 युनिटचे ध्येय आहे.

ते म्हणाले, चीनची लोकसंख्या मोठी असूनही तिचे (उर्जा) वितरण आमच्या तीन तेल कंपन्यांच्या तुलनेत आजिबात नाही. यामध्ये शहर गॅस वितरण कंपन्यांचाही समावेश आहे. प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत आम्ही सप्टेंबर अखेरपर्यंत 8 कोटी एलपीजी कनेक्न देण्याचे उद्दीष्ट साध्य करु. स्वच्छ इंधन चळवळीमुळे छातीच्या आजारात 20 टक्के घट झाली आहे.

इथेनॉल मिश्रणासंदर्भात ते म्हणाले, आम्ही अतिरिक्त अन्नधान्याच्या साठ्यातून इथेनॉल देखील बनवू, सध्या आपण उसाच्या गुळापासून इथेनॉल तयार करत आहोत. पाच वर्षांपूर्वी आम्ही पेट्रोलबरोबर इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला होता. ते प्रमा 1.5 टक्क्यांवरुन 7 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे आमचे अंतिम ध्येय आहे.

सध्या भारतात दरमहा 850 कोटी लिटर डिझेल वापरले जाते. 2030 पर्यंत डिझेलमध्ये 5 टक्के बायोडिझेल चे मिश्रण करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. अशा प्रकारे एका वर्षात 500 कोटी लिटर बायोडिझेलची आवश्यकता आहे.

भारतात 2700 कोटी लिटर स्वयपाक तेलाचा वापर केला जातो. त्यापैकी हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन मधून मिळणार्‍या तेलामधून 140 युसीओ बायोडिझेल रुपांतरणासाठी गोळा करता येईल. जे दरवर्षी सुमारे 110 कोटी लिटर बायोडिझेल देईल. सद्यस्थितीत यूको संग्रहित करण्याच्या दृष्टीने कोणतीही साखळी नाही. जी मोठी संधी देवू शकेल.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here