उसाच्या थकबाकीप्रकरणी अधिकाऱ्यांनी केले हात वर

 

बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे, आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच

बिजनौर (उत्तर प्रदेश) चीनी मंडी

उसाच्या थकबाकी संदर्भात आझाद किसान युनियन आणि जिल्हा प्रशासन यांच्यात झालेली बैठक पुन्हा निष्फळ ठरली. शेतकऱ्यांनी एफआरपीची बिले दिली नाही तर, सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

बिजनौरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आझाद किसान युनियनने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली होती. त्यावेळी भाजपचे आमदार भारतेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी वेगळ्या कक्षात चर्चा केली. पण, शेतकऱ्यांची दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.

दुसरीकडे जिल्हाधिकार अटलकुमार राय, आतिरिक्त जिल्हाधिकारी बृजेश कुमार, जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह, बिजनौर कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी ए. के. सिंह, व्यवस्थापक राहुल चौधरी यांनी शेतकऱ्यांशी सुमारे दीड तास चर्चा केली. पण, कोणताही तोडगा निघाला नाही.

बैठकीत किमान ५० कोटी रुपयांची थकबाकी तातडीने द्यावी असा प्रस्ताव युनियनने ठेवला होता. पण, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोणतिही जबाबदारी घेण्यास टाळाटाळ केल्याचे चित्र होते. तसेच शेतकऱ्यांनी त्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित करावे, असा आग्रह अधिकाऱ्यांनी धरला. भाजपचे आमदार भारतेंद्र सिंह यांनी देखील याप्रश्नावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निर्णय देणार आहेत, असे सांगून शेतकऱ्यांशी चर्चा करणे टाळले.

धरणे आंदोलन सुरूच

चांदपूरमध्ये ऊस बिल थकबाकीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरूच आहे. चौधरी दलेलसिंह आणि शीशपाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन एफआरपीचे पैसे मिळाल्यानंतरच मागे घेतले जाईल, असे शेतकऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले.

डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप:  http://bit.ly/ChiniMandiApp  

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here