भोपाळ : राज्याचे कृषिमंत्री कमल पटेल यांनी गुरुवारी सांगितले की, टोळांच्या आक्रमणाने झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षणानंतर टोळ हल्ले ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्याचा सरकारचा विचार आहे.
जर टोळ हल्ले ही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित झाली तर, टोळांच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची संपूर्ण भरपाई शेतकऱ्याला मिळू शकेल, असे पटेल यांनी सांगितले.
मंत्री यांनी सांगितले की, सरकार केवळ टोळांचा नाश करण्याचा विचार करीत नाही तर टोळांच्या हल्ल्यापासून दिर्घकालीन बचावाच्या दृष्टीने टोळांची अंडी देखील नष्ट करण्याच्या विचारात सरकार आहे.
ते म्हणाले की, या टोळ हल्ल्यांबाबत सरकार वैज्ञानिकांशी ही समस्या नियंत्रणात आणण्याच्या उपायांवर चर्चा करीत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.