पाईपलाईनमधून इथेनॉल वाहतूक करण्याची सरकारची योजना

नवी दिल्ली : केंद्र सरकार इथेनॉलची वाहतूक रेल्वे आणि ट्रकांपासून पाईपलाईनच्या माध्यमातून करण्याची योजना तयार करीत असल्याचा अहवाल ईटी नाऊने १७ ऑगस्ट दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार सरकार रेल्वे आणि ट्रक पासून पाईपलाईनमध्ये इथेनॉल पाठविण्याचा विचार करीत आहे. यासाठी जैव इंधन पाईपलाईन बनविण्यासाठी अशा प्रकारच्या पाईपलाईन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत सरकारने चर्चा सुरू केली आहे.

प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने आपल्या रिफायनरीच्या माध्यमातून पाईपलाईनमझधून इथेनॉल वाहतूक करण्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसोबत (आयओसी) बैठक घेतली आहे. बिहारमधील बरौनी रिफायनरीमधून वाहतूक सुरु करण्याचा आयओसीचा प्रयत्न आहे. सरकार कोणत्याही ट्रेलबॅकची ओळख पटविण्यासाठी बॅचमध्ये पाईपलाईनमधून वाहतुकीचे ड्राय रन घेईल. तेल वितरण कंपन्या सद्यस्थितीत रेल्वे आणि ट्रक मधून इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे वहन करतात.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here