सरकारकडून ऑगस्ट २०२३ साठी अतिरिक्त २ LMT साखर कोटा जारी

सणासुदीच्या काळातील मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारने ऑगस्ट २०२३ साठी अतिरिक्त २ LMT साखर कोटा जारी केला आहे. याबाबत २२ ऑगस्ट २०२३ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

यापूर्वी २८ जुलै २०२३ रोजी जारी अधिसूचनेनुसार, अन्न मंत्रालयाने ऑगस्ट २०२३ साठी २३,५० LMT मासिक साखर कोटा मंजूर केला होता. ऑगस्ट २०२२ पेक्षा हा कोटा १.५० LMT ने अधिक होता. आता अतिरिक्त कोट्यासह ऑगस्ट २०२३ साठी एकूण २५.५० LMT कोटा देण्यात आला आहे. ऑगस्ट २०२२ साठीच्या कोट्यापेक्षा हा ३.५० LMT जास्त आहे.
सरकारने जुलै २०२३ साठी २४ LMT मासिक साखर कोटा मंजूर केला होता. शिवाय, विक्री न झालेल्या साखरेसाठी १५ दिवसांची मुदतवाढ दिली होती.

बाजार अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, सरकारने सणासुदीच्या काळात दर स्थिर राहावेत यासाठी साखरेचा अतिरिक्त कोटा जारी केला आहे. या धोरणात्मक निर्णयामुळे साखरेच्या किमती नियंत्रणात राहण्यास मदत होईल. साखरेचा दर प्रती क्विंटल ₹ ३० ते ५० पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील साखरेचे दर एस ग्रेडसाठी ₹३६१० प्रती क्विंटल आणि एम ग्रेडसाठी ₹३६७५ ते ३७०० प्रती क्विंटलपर्यंत गेले आहेत. ते कमी करण्यासाठी सरकारने अतिरिक्त साखर बाजारात आणली आहे.

सरकारने सणासुदीच्या आधी अतिरिक्त साखर सोडण्याचे हे पाऊल स्वागतार्ह असल्याचे दिसते. टोमॅटो आणि कांदा यासारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती पाहता, सरकारला इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा आणि मागणी सुरळीत करायची आहे. दरवाढ रोखणे आणि इथेनॉल मिश्रण कार्यक्रमासारख्या योजनांची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा या सरकारचा उद्देश आहे.

अधिसूचनेनुसार, कोणत्याही साखर कारखान्याने ऑगस्ट, २०२३ चा कोटा समायोजित करण्याची माहिती दिली नसल्यामुळे, सर्व कारखान्यांनी नमूद केलेला कोटा ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत विकला जाईल याची खात्री करावी. तसेच, अतिरिक्त वाटपासह या महिन्याच्या कोट्याचा कोणताही विस्तार केला जाणार नाही. त्याची विक्री चालू महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्येच करावी लागेल. या आदेशाचे उल्लंघन केल्यास अत्यावश्यक वस्तू कायदा, १९५५ अंतर्गत वेळोवेळी केलेल्या सुधारणांनुसार दंडात्मक तरतुदी लागू होतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

अधीसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here