सरकारने ऊस दर ६०० रुपये क्विंटल जाहीर करावा : पश्चिम प्रदेश मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष

सहारनपूर : राज्य सरकारने गेल्या चार वर्षांपासून ऊस दर वाढवलेला नाही असा आरोप पश्चिम प्रदेश मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगत सिंह वर्मा यांनी केला. याशिवाय, चौदा दिवसांमध्ये ऊस बिले देण्यासह शेतकऱ्यांना मतदानावेळी देण्यात आलेली आश्वासने खोटी असल्याचेही ते म्हणाले.

सोमवारी सहकारी ऊस समितीच्या आयोजित बैठकीत भगत सिंह वर्मा यांनी सांगितले की, राज्यातील १२० साखर कारखान्यांकडे २०२०-२१ या वर्षातील सुमारे ११ हजार कोटी रुपयांची उसाची थकबाकी आहे. याशिवाय गेल्या काही वर्षांमध्ये उशीरा देण्यात आलेल्या ऊस बिलांवर व्याजाचीही आकारणी करण्यात आलेली नाही.

जर शेतकऱ्यांना त्वरीत उसाचे पैसे मिळाले नाहीत तर शेतकरी आंदोलन सुरू करतील असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी ऊस दर ६०० रुपये क्विंटल जाहीर करावा अशी मागणी सरकारकडे केली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र चौधरी होते. तर कार्यक्रमाचे संचालन आसिम मलिक यांनी केले. यावेळी नरेश कुमार, अजीत प्रधान, सुधीर चौधरी, संजय चौधरी, रविंद्र चौधरी, हरपाल सिंह, यशपाल त्यागी, सुभाष त्यागी, अमित कुमार, महबूब हसन, हाजी सुलेमान आणि गुरविंदर सिंह आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here