सरकारने ऊस दर वाढवून आश्वासनपूर्ती करावी : AIADMK

44

त्रिची, तामिळनाडू : एआयडीएमकेचे समन्वयक ओ पनीरसेल्वम आणि उप समन्वयक एडप्पादी के. पलानीस्वामी यांनी भात तसेच उसाच्या किमान समर्थन मुल्यात (एमएसपी) वाढ आणि प्रत्यक्ष खरेदी केंद्रांची क्षमता न वाढविण्याचे आपले आश्वासन पूर्ण न केल्याबद्दल डीएमके सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांच्या ‘Vidiyalai Nokki Stalinin Kural’ अभियानावर टीका करताना विरोधी पक्षांच्या नेत्यांनी डीएमके सरकार जनतेला निराशेकडे नेण्याचे नेतृत्व करीत असल्याचे म्हटले आहे.

द टाइम्स ऑफ इंडिया मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, एआयडीएमकेने भाताच्या एमएसपीमध्ये वाढ करून ती २५०० रुपये आणि उसाची एमएसपी ४००० रुपये प्रती टन करण्याच्या आश्वासनाची द्रमुकला आठवण करून दिली आहे. डीएमकेच्या सहा महिन्याच्या कार्यकाळाता भाताची एमएसपी २०२१-२२ साठी २०१५ रुपये प्रती क्विंटल आणि एक टन उसाचा दर २९०० रुपये होता. त्यामध्ये साखर उतारा १० टक्के होता. दहा टक्क्यांपेक्षा कमी साखर उतारा असेल तर उसाची एमएसपी २७५५ रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here