महाराष्ट्रात पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदत द्यावी: अजित पवार

मुंबई : महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारने पावसाचा फटका बसलेल्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ७५,००० रुपये प्रती हेक्टरी मदत जाहीर करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत बसून निर्णय घेऊ नका असेही आवाहन केले. गेल्या पंधरवड्यापासून मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या विदर्भ आणि मराठवाडा विभागाच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी गढचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, गढचिरोलीत जवळपास २५,००० हेक्टर आणि चंद्रपूरमध्ये ६३,००० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. या विभागात १० लाख हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले.

पवार म्हणाले की, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांची दुर्दशा दूर करण्यासाठी विधानसभेचे विशेष सत्र बोलावण्याची गरज आहे. चंद्रपूरमधील १५ तालुक्यांत सोयाबीन, कापून, भात व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वी पवार यांनी नव्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला खूप ऊशीर झाल्याबद्दल टीका केली होती. ते म्हणाले की, मदत कार्य आणि मार्गदर्शन, देखेख करणारे कोणीही नाही. कारण जिल्ह्यांसाठी पालकमंत्री नियुक्ती केलेली नाही. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना गतीने मदत देण्याची मागमी केली. तसेच जुनी कर्जे फेडू न शकलेल्या शेतकऱ्यांशी भेदभाव करू नये असा आग्रह केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here