संजीवनी साखर कारखान्याला ‘संजीवनी’ देण्याचा सरकारचा प्रयत्न

पणजी : सुमारे १०१ कोटी रुपयांचा तोटा झालेला राज्य सरकारचा संजीवनी साखर कारखाना चालू ठेवण्यासाठी कोणती पावले उचलावी लागतील याचा सरकार अभ्यास करत असल्याची माहिती गोव्याचे सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी विधासभेत दिली. महिनाभरात याविषयी माहिती घेऊन अभ्यास केल्यानंतर सरकार त्यानुसार निर्णय घेणार , असेही गावडे यांनी स्पष्ट केले.

गावडे म्हणाले, ‘राज्यात उसाचा तुटवडा असल्याच्या कारणाबरोबरच इतर अनेक कारणांनी कारखान्याला वर्षाला सरासरी ८ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. सरकार आता कारखाना पुन्हा सुरू करण्याचा, अपग्रेड करण्याचा, नवीन कन्सट्रक्शन किंवा कारखाना कायमस्वरूपी बंद करण्याचा, या सगळ्या पर्यायांचा विचार करत आहे. सध्या कारखान्याचे २६८ कामगार आणि ९५६ ऊस उत्पादक या साखर कारखान्यावर अवलंबून आहेत.’ या वर्षी नोव्हेंबर महिन्यात साखर कारखाना पुन्हा सुरू करणे शक्य नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या संदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ‘ज्या शेतकऱ्यांनी या कारखान्याच्या भरवशावर ऊस उत्पादन घेतले आहे. त्यांचे नुकसान होणार नाही. राज्य सरकार त्यांचा ऊस खरेदी करेल आणि इतर राज्यातील साखर कारखांन्यांना तो पुरवण्यात येईल. शेतकऱ्यांना त्याची आधारभूत किंमतही दिली जाईल.

या संदर्भात काँग्रेस आमदार प्रतापसिंह राणे यांनी शून्य प्रहरात प्रश्न उपस्थित केला होता. सरकारने कारखान्यात इथेनॉल उत्पदनाचा पर्याय तपासून घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सरकार कारखान्याबाबत पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची मदत घेत असल्याचे सहकार मंत्री गावडे यांनी सभागृहात सांगितले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here