सरकारकडून आधार कार्ड फोटोक़ॉपीबद्दलची नवी ॲडव्हायजरी स्थगित

नवी दिल्ली : आधार कार्ड (Aadhar Card) ची फोटोकॉपी (झेरॉक्स प्रत) इतरांसोबत शेअर न करण्याच्या UIDAI चे प्रसिद्धी पत्रक व्हायरल झाल्यानंतर सरकारने याबाबतची ॲडव्हयजरी तत्काळ प्रभावाने मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. २७ मार्च रोजी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालय आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात आधार कार्डधारक फक्त युआयडीएआयकडून प्रमाणित संघटनांनाच फोटोककॉपी दाखवू शकतो असे म्हटले होते. अन्य कोणत्याही संघटनेला आधार कार्ड दाखवले जावू नये असे म्हटले होते. आधार कार्डचा गैरवापर केला जाऊ शकतो असे यात म्हटले होते. आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने सांगितले की, आधीची ॲडव्हायजरी तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात आली आहे. कारण, याबाबत लोकांकडून चुकीची व्याख्यात तयार केली जाण्याची शक्यता आहे.

नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, युआयडीएआय आणि मंत्रालयाने २७ मे रोजी आधार कार्डच्या फोटोकॉपीचा गैरवापर केला जाण्याची शक्यता वर्तवली होती. त्याऐवज मास्क आधार कार्डचा वापर करावा असे म्हटले होते. हॉटेल्स, सिनेमागृहे अथवा परवाना नसलेल्या संस्थांना आधार कार्ड घेण्याची आणि आपल्याकडे घेण्याची अनुमती नाही. आधारकार्ड मागणाऱ्यांकडे वैध परवाना असणे गरजेचे आहे. आता सरकारने म्हटले आहे की, यूआयडीएआय बेंगळुरू कार्यालयाने आधीची ॲडव्हायजरी जारी केली होती. ती मागे घेण्यात आली आहे. मात्र, लोकांनी आधार कार्डचा वापर जबाबदारीने करावा. मास्क्ड आधार कार्ड https://myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटवरून डाऊनलोड करून घ्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here