धुरी साखर कारखान्याचा १४ सप्टेंबर रोजी होणार लिलाव

धुरी : पंजाब सरकारने वारंवार नोटीस देवूनही शेतकऱ्यांना ७.८२ कोटी रुपयांची थकबाकी देण्यात अपयशी ठरलेल्या धुरीतील भगवानपुरा साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेडचा लिलाव १४ सप्टेंबर रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तहसीलदार कुलदीप सिंह यांनी कारखान्याच्या भिंतीवर ८ सप्टेंबर रोजी याबाबतची नोटीस लावली आहे. या नोटिशीत असा उल्लेख करण्यात आला आहे की, १५ जुलै २०२२ रोजी पाठवलेल्या पत्रात धुरीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्याची संपत्ती जप्त करण्यास मंजुरी दिली होती. कारखान्यात जवळपास २५० कर्मचारी आहेत. पंजाब भू – महसूल अधिनियमाच्या कलम ७५ नुसार लिलाव केला जाईल.

दि इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आदेशात पुढे म्हटले आहे की, कारखान्याकडे एकूण १३.७८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मात्र, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि उप महा व्यवस्थापकांनी वारंवार देणी देण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली. आणि आतापर्यंत ७.८२ कोटी रुपये थकबाकी आहे. ७.८२ कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी जवळपास ५५ लाख रुपये हरियाणातील शेतकऱ्यांचे आहेत. थकीत रक्कमेचा बहुतांश हिस्सा २०२१-२२ या ऊस हंगामातील आहे. तर हरियाणातील काही शेतकऱ्यांचे २०२०-२१ मधील हंगामातील रक्कम थकीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here