इथेनॉल बुस्ट: सरकार देणार मक्का उत्पादनाला प्रोत्साहन

86

नवी दिल्ली : मक्याची लोकप्रियता फक्त जागतिक पातळीवर वाढत नसून भारतातही पोल्ट्री आणि इथेनॉल उद्योगासह विविध क्षेत्रात वाढत आहे असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले.

केंद्रीय कृषिमंत्री तोमर म्हणाले की, सरकार पिक वैविध्यिकरणाच्या धोरणातून विविध माध्यमातून शेतकऱ्यांना मक्याचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. गेल्या आठ वर्षांत मक्क्याच्या एमएसपीमध्ये ४३ टक्के वाढ झाली आहे. उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत आहे.

फिक्कीद्वारे आयोजित India Maize Summit 2022च्या आठव्या परिषदेत बोलताना कृषीमंत्री तोमर म्हणाले की, मक्का उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here