नवी दिल्ली : सरकार देशांतर्गत उत्पादन आणि अंतर्गत मागणी याचा आढावा घेतल्यानंतर सध्याचा साखर निर्यात कोटा ६० लाख टनावरून वाढविण्याविषयी पुढील महिन्यात निर्णय घेईल असे अन्न सचिव संजीव चोपडा यांनी गुरुवारी सांगितले.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ६ मिलियन टन साख कोटा जाहीर करण्यात आला होता. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोपडा यांनी सांगितले की, आम्हाला या वर्षी साखर उत्पादनाबाबत वेगवेगळी माहिती मिळत आहे. आणि पुढील काही आठवड्यात आम्ही उत्पादनाबाबत आमच्या स्तरावर आढावा घेवू. ते म्हणाले की, अंदाजे देशांतर्गत खप आणि इथेनॉल उत्पादन कार्यक्रमाच्या आधारावर सरकार साखर निर्यातीच्या दुसऱ्या टप्प्याचा विचार करेल.