इथेनॉल उद्योग २ लाख कोटी रुपयांवर नेण्याचा सरकारचा प्रयत्न : मंत्री गडकरी

57

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इथेनॉलच्या अर्थव्यवस्थेला २०,००० कोटी रुपयांवरून २ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले. फिक्कीच्यावतीने (एफआयसीसीआय) आयोजित दुसऱ्या वार्षिक संमेलनात ‘अल्टरनेटिव्ह फ्यूएल रोडमॅप फॉर इंडिया @७५ : मुव्हिंग टुवर्ड्स ग्रीनर फ्यूचर’ या विषयावर ते बोलत होते. प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याच्या अपेक्षेसह या उद्योगातील अपार शक्यतांची ओळख त्यांनी करून दिली. आम्ही सर्व वाहन निर्मिती कंपन्यांना फ्लेक्स फ्युएल इंजिन बनविणे अनिवार्य करणार आहोत, असे मंत्री गडकरी यांनी सांगितले.

आपल्या भाषणादरम्यान, केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, फ्लेक्स फ्युएल वाहने वाहतुकीच्या क्षेत्रात कार्बनमुक्तीसाठी महत्त्वाची भूमिका निभावतील. त्यातून पर्यावरण, अर्थव्यवस्था यांचे रुप टिकावून असेल. मंत्री गडकरी यांनी आपल्या भाषणात ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेचे उदाहरण दिले. तेथे बहुतांश ऑटोमोबाईल कंपन्या फ्लेक्स फ्युएल इंजन बनवतात. गडकरी यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक रिक्षा, कार, स्कूटर आणि इलेक्ट्रिक सायकलसारख्या वाहनांसाठी देशांतर्गत बाजारपेठेत पुरेशी मागणी दिसून आली आहे. त्यांनी अनुदान, जीएसटी सवलत, कर्ज सुविधा, पीएलआय आणि अन्य योजनांच्या माध्यमातून अनुकूल धोरण बनवून इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारांना धन्यवाद दिले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here