सरकारला व्याज माफ करण्याचा अधिक़ार नाही : वीएम सिंह

133

तितावी (मुजफ्फरनगर) : सरकारला शेतकर्‍यांचे व्याज माफ करण्याचा अधिकार नाही. कोर्टाचा आदेश आहे की, 14 दिवसानंतर ऊसाची किंमत दिल्यावर कारखान्यांना व्याज द्यावे लागणार. शेतकरी आता मागे हटणार नाहीत. सतत वाढणार्‍या किंमती पाहून ऊस मूल्यात 435 रुपये प्रति क्विंटल जाहीर होणे आवश्यक असल्याचे, राष्ट्रीय शेतकरी कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदार वी.एम. सिंह यांनी सांगितले.

तितावी साखर कारखान्याबाहेर धरणे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांशी ते बोलत होते. ते म्हणाले, एक वेळ होती, जेंव्हा शेतकरी आपल्या मुलीचा विवाह शेती करणार्‍या मुलाशी करायचे, आज स्थिती उलटी आहे. आज फक्त शेतीवर उदरनिर्वाह होवू शकत नाही. लग्न करताना शेतीला प्राधान्य दिले जात नाही. ऊसावरचे शेतकर्‍यांचे मूल्य सतत वाढत आहे. 290 रुपये प्रति क्विंटल खर्च येत आहे. ऊसाचे मूल्य 435 रुपये क्विंटल होणे गरजेचे आहे. पीक आमचे, मूल्य तुमचे असे आता चालणार नाही. 19 ऑक्टोबर ला आपल्या संघर्षाला मजबूत करण्यासाठी मुरादाबादला पोेचणे गरजेचे आहे.

समाजवादी पक्षावर शेतकरी विरोधी असा आरोप करुन, ऊस शेतकर्‍यांचे व्याज माफ करुन सपा सरकार ने शेतकरी विरोधी काम केले होते. सरकारला व्याजाचे पैसे माफ करण्याचा अधिकार नाही. कोर्टाने निश्‍चित केले आहे की, 14 दिवसात पैसे देता येत नसतील तर, साखर कारखान्यांना व्याजासहित पैसे द्यावे लागतील. ते म्हणाले, देशात पहिल्यांदा 144 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या ज्योतिबा फुले यांनी शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यासाठी ब्रिटीश सरकारला मजबूर केले होते. माणुसकीच्या लढाईसाठी मनोधैर्य असणे आवश्यक आहे. ते म्हणाले, एकट्या तितावी साखर कारखान्यावर शेतकर्‍यांच्या व्याजाचे 14 करोड 86 लाख रुपये देय आहेत. आंदोलना वेळी, कारखान्याचे जीएम धीरच यांनी शेतकर्‍यांना सांगितले की, गेल्या हंगामातील सर्व थकबाकी भागवली आहे. सरकारचे आदेश आल्यानंतर व्याजही दिले जाईल.

यावेळी भारत भूषण व करम इलाही, संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुमित मलिक, अशोक प्रधान, अमरपाल सुरेंदर, सुकरमपाल, किशनपाल, नरेश वीरेंदर, धर्मबीर मुकेश, सनसबीर, मुकेश, सहदेव, किरनशनपाल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र यांनी केले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here