नवी दिल्ली : मध्य प्रदेशात गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकारने नवे धोरण आखले आहे. मध्य प्रदेश देशात गहू उत्पादनात आघाडीवर आहे. २०२०-२१ मध्ये मध्य प्रदेशात सर्वाधिक १५.९४ लाख शेतकऱ्यांकडून १२९.४२ लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली आणि २०२१-२२ मध्ये १७.२५ लाख शेतकऱ्यांकडून १२८.१५ लाख मेट्रिक टन गव्हाची, दुसऱ्या क्रमांकाची खरेदी झाली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा चांगला भाव मिळाला आहे.
कृषी जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आता मध्य प्रदेश सरकारने नवी रणनीती तयार केली आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी सरकार शरबती गव्हाला जीआय टॅग मिळवून देण्याच्या प्रक्रियेला गती देणअयात आली आहे. त्यामुळे शरबती गव्हाला चांगला भाव मिळण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांकडून थेट खरेदी करण्यासाठी ४५०० हून अधिक खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यामुळे राज्य सरकारला वाढीव उत्पादनाचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल. मध्य प्रदेशात कालव्याच्या सिंचनाखाली ४३ लाख हेक्टर क्षेत्र आहे, जे उत्पादन वाढवण्यासाठी पिकाच्या गंभीर टप्प्यावर वेळेवर सिंचनाची उपलब्धता सुनिश्चित करते. शरबती गव्हाचे पीक मध्य प्रदेशात सुमारे ९ लाख हेक्टर क्षेत्रात घेतले जाते. यात सी ३०६, सुजाता (एचआय-६१७, जेडूब्ल्यूएस १७), अमर, अमृता , हर्षिता, एचडी २९८७, जेडब्ल्यू – ३१७३ या जातींचा समावेश आहे.