शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊसतोडणी यंत्रावर अनुदान देणार- सुभाष देशमुख

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊसतोडणी यंत्रावर अनुदान शासन देणार असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी  विधानपरिषदेत दिली, अनुदान मिळणेकारिता राज्यस्तरीय प्रकल्प मंजूर समितीच्या मंजूरिची आवश्यकता असते.

नांदेड जिल्ह्याबरोबर राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना ऊसतोडणी यंत्राचे अनुदान मिळण्याबाबतची सूचना सदस्य अमरनाथ राजूरकर यांनी मांडली होती, त्या सूचनेला अनुसरून श्री.देशमुख बोलत होते
.
श्री. देशमुख म्हणाले, केंद्र सरकारमार्फत सहकारी साखर कारखाने, व्यक्ती किंवा त्यांचा समुहगट, शेतकरी किंवा त्यांचा समुहगट व स्वयंसहाय्यता गट त्यांच्यासाठी ऊसतोडणी यंत्र खरेदी अनुदान योजना राबविली जात आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत राज्यस्तरीय प्रकल्प समितीने मंजूर केलेल्या शेतकऱ्यांना ऊसतोडणी यंत्राचे अनुदान दिलेले आहे तसेच उर्वरित शेतकऱ्यांना प्रकल्प मंजूरी समितीच्या ४ जुलै, २०१९ रोजी होणाऱ्या सभेत हा मांडणार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

या चर्चेत सदस्य रामहरी रुपनवर, सतीश चव्हाण, अनिल परब आदींनी सहभाग नोंदविला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here