नवी दिल्ली : विदेशी व्यापार महासंचालनालयाने (DGFT) टेरिफ-रेट कोटा (TRQ) योजनेअंतर्गत बुधवारी युरोपीय युनियनला ५,८४१ टन आणि अमेरिकेला ८,६०६ टन साखर निर्यातीची परवानदी देण्यात येत असल्याची अधिसूचना जारी केली आहे.
DGFT ने एका सार्वजनिक सूचनेमध्ये म्हटले आहे की, एक ऑक्टोबर, २०२२ ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत TRQ योजनेअंतर्गत युरोपीयन संघाला (EU) निर्यात केली जाणारी ५,८४१ मेट्रिक टन कच्ची / पक्रिया केलेले साखरेचे प्रमाण आणि US ला निर्यात केली जाणारी ८,६०६ MTRV कच्च्या साखरेचे प्रमाण अधिसूचित करण्यात येत आहे.
TRQ अंतर्गत भारताकडून कमी टेरिफ आकारून साखर निर्यात केली जाते. जेव्हा हा कोटा पूर्ण होतो, तेव्हा जादा एक्स्पोर्टवर टेरिफ मध्ये वाढ केली जाते.
सरकारने २०२२-२३ साठी ६० लाख टन साखर निर्यातीची परवानगी दिली आहे. आणि अधिक निर्यातीची परवानगी देण्यापूर्वी सरकार देशांतर्गत मागणी, पुरवठ्याचा आढावा घेईल असे जाहीर करण्यात आले आहे.