साखर, धान्यावर आधारित फिडस्टॉकपासून इथेनॉल उत्पादनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखर आणि धान्यावर आधारित फिडस्टॉकपासून इथेनॉल उत्पादनासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. साखर कारखाने आणि बी हेवी, सी हेवी मोलॅसिस, उसाचा रस, साखर आणि, मक्का, तुकडा तांदूळ, अतिरिक्त तांदूळ, भारतीय खाद्य निगमकडून उपलब्ध होणारा तांदूळ आदींपासून इथेनॉलच्या उत्पादनाशी संबंधीत ही मार्गदर्शक तत्वे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पडताळणी करणाऱ्या एजन्सींना पडताळणी अहवालाची एक प्रत साखर आणि वनस्पती तेल संचालनालय, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग तसेच पेट्रोलियम गॅस मंत्रालयाला पंधरवड्याच्या आत पाठवावी लागेल. जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये साखर, मोलॅसीसवर आधारित इथेनॉल डिस्टिलरी आणि धान्यावर आधारित डिस्टिलरींचा समावेश आहे. हे निकष डिस्टिलरींना विविध मार्गांपासून उत्पादित इथेनॉलचे प्रमाण ठरवण्यास उपयुक्त ठरतील. निर्देशांमध्ये म्हटले आहे की, या डिस्टिलरी युनिटना एका वेळी एका प्रकारच्या फिडस्टॉकचा वापर करता येईल.

संपूर्ण अधिसूचना वाचण्यासाठी इथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here