सरकारकडून एप्रिल २०२२ साठी २२ लाख टन साखर विक्री कोटा जारी

केंद्र सरकारने ३१ मार्च २०२२ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशातील ५३० साखर कारखान्यांना एप्रिल महिन्यासाठी २२ लाख टनाचा साखर विक्री कोटी मंजूर केला आहे.

या वेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत जादा साखर कोटा देण्यात आला आहे. अन्नधान्य मंत्रालयाने मार्च २०२२ साठी २१.५० लाख टन साखर विक्रीस मंजुरी दिली होती. तर दुसरीकडे एप्रिल २०२१ च्या तुलनेत यंदा समान साखर कोटा देण्यात आला आहे. सरकारने एप्रिल २०२१ साठी २२ लाख साखर कोटा जाहीर केला होता.

उद्योगातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, उन्हाळ्यात वाढणारी मागणी आणि कोविड १९च्या निर्बंधानंतर स्थिती सुधारल्याने मागणीत तेजी येण्याची शक्यता आहे. साखरेच्या दरात ६० ते ८० रुपये प्रती क्विंटलपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा बाजारातील तज्ज्ञांना आहे.

केंद्र सरकारने साखरेचा पुरवठा नियंत्रित करण्यासाठी आणि दरात स्थिरता आणण्यासाठी मासिक कोटा पद्धती स्वीकारली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here