संजीवनी कारखाना सुरु न झाल्यास शेतकऱ्यांच्या उपजिविकेवर होणार परिणाम: सुदीन ढवलीकर

पोंडा:गोव्यातील एकमेव संजीवनी साखर कारखान्याचा वाद वाढतच आहे. पूर्व पीडब्ल्यूडी मंत्री आणि आमदार सुदीन ढवलीकर यांनी सांगितले की, 1,500 ऊस शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी संजीवनी कारखाना सुरु ठेवण्यासाठी वार्षिक 5 करोड रुपये खर्च करणे सरकारसाठी फार मोठी गोष्ट नाही. याबाबत सरकारने अजून काही निर्णय घेतला नाही ही खरी खंत आहे. ते म्हणाले, 2020-21 मध्ये जर साखर कारखान्याने गाळप केले नाही तर शेतकऱ्यांच्या उपजिविकेवर मोठा परिणाम होउन त्यांचे नुकसान होऊ शकते.

ते म्हणाले, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बान्दोडकर यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन साखर कारखान्याची स्थापना केली आणि सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सोडून, माझ्या सह सर्व मुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी साखर कारखाना चांगल्या तऱ्हेने सुरु होण्यासाठी योगदान दिले आहे. 2012 मध्ये ही, तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांच्या सहकार्याने साखर कारखान्याच्या पुनरुद्धारासाठी 5 करोड रुपयाचे बजेट मंजूर केले होते. पण जे आमदार स्वतःला शेतकरी पूत्र म्हणवतात, त्यांना शेतकऱ्यांच्या या अडचणींची जाणिव कधीच झाली नाही असे खेदाने म्हणावे लागेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here