कोविड १९ नंतर सरकारने अर्थव्यवस्था सुधारली: अर्थमंत्री सीतारमण

101

नवी दिल्ली : कोविड १९ महामारी असतानाही केंद्र सरकारने देशाच्या दिर्घकालीन विकासासाठी आवश्यक आर्थिक सुधारणा रोखल्या नाहीत असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी शनिवारी सांगितले. लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करताना सीतारामण यांनी सांगितले की, या सुधारणा आगामी दशक आणि पुढील काळात जगात देशाला मजबूत करण्यासाठी मदत करणाऱ्या ठरतील.

अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले की, कोरोना महामारीने आम्हाला अशा सुधारणा करण्यापासून रोखले नाही की ज्या आगामी काळात उपयुक्त ठरतील. आमच्याकडे एक विशाल दृष्टिकोन आहे. त्यातून कोरोना महामारी असतानाही मृत्यू दर कमी राहिला. कोरोना बाधितांच्या संख्येतही घट आली आहे.
सीतारमण यांनी शुक्रवारी राज्यसभेत चर्चा करताना विरोधी पक्षांवर टीका केली. सरकारने सर्वसामान्य माणसासाठी अनेक योजना राबविल्या असे त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here