अरुरन कारखान्याचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची सरकारकडे मागणी

चेन्नई : तंजावूर येथील अरुरन साखर कारखान्याचे सर्व प्रलंबित मुद्दे सोडवावेत आणि शेतकऱ्यांना त्यांची थकबाकी परत करावी अशी मागणी पीएमकेचे अध्यक्ष अंबुमणी रामदास यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत दि टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ते म्हणाले की, २०१८-१९ मध्ये दिवाळखोरीत निघालेल्या तंजावूर आणि कुड्डालोरमध्ये शेतकऱ्यांच्या नावावर जवळपास ४५० कोटी रुपयांचे कर्ज उचलण्यात आले आहे. आता या बँका शेतकऱ्यांवर कर्ज वसुलीसाठी दबाव टाकत आहेत, असे अंबुमणी रामदास यांनी सांगितले. सरकारने साखर कारखान्याशी संबंधीत सर्व प्रश्नांची सोडवणूक करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी रामदास यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here