संजीवनी च्या शेतकऱ्यांना 10 मे पर्यंत सरकारकडून थकबाकी मिळण्याचे आश्वासन

पोंडा(गोवा): गोवा सरकार येथील संजीवनी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांना त्यांची प्रलंबित असणारी ऊस थकबाकी भागवणार आहे. सरकारने शेतकऱ्यांना ही थकबाकी 10 मे पर्यंत भागवली जाईल असे आश्वासनही दिले आहे.

गोव्याचे सहकार मंत्री गोविंद गौड यांनी सांगितले की, संजीवनी साखर कारखान्याला 31 जानेवारी पर्यत ऊस गाळप केलेल्या शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी 10 मे पर्यंत भागवण्यात यईल. ते म्हणाले, बिलाचे कमीत कमी 50 टक्के पैसे लगेचच भागवले जातील. गौड़ यांनी पैसे देण्यात झालेल्या विलंबासाठी कोरोना वायरस आणि लॉकडाउन ला कारणीभूत ठरवले आहे.

गोवा येथील संजीवनी कारखाना बंद झाल्याामुळे गोवा सरकार ने राज्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला कर्नाटक राज्य यथील लैला फैक्ट्री मध्ये 27,000 मीट्रिक टन पेक्षा अधिक ऊसाचा पुरवठा केला होता. गौडा म्हणाले, कर्नाटक येथील लैला फैक्ट्री ने त्यांच्या बिलाला मंजूरी दिली नसल्याने शेतकऱ्यांना पैसे मिळू शकत नाहीत. आणि लॉक डाउन मुळे अधिक उशिर होऊ शकतो. गोवा येथील ऊस शेतकऱ्यांच्या समस्या पाहून गौड म्हणाले की, त्यांनी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे आणि राज्य सरकारने आपल्या फंडातून 10 मे पर्यंत शेतकऱ्यांचे निम्मे पैसे भागवण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच लैला फॅक्टरी कडून पैसे आल्यावर त्याचेही यामध्ये समायोजन केले जाईल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here