पीएम किसान योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची करडी नजर

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे १२ हप्ते पाठविण्यात आले आहेत. ही रक्कम ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. जवळपास ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १६ हजार कोटी रुपये डीबीटीच्या माध्यमातून देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता १३ वा हप्ता पाठविण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात हा हप्ता पाठवला जाईल.

आजतकमधील वृत्तानुसार, अपात्र लोकांकडून या योजनेचा लाभ घेतला जाण्याची शक्यता असते. केंद्र सरकारने आता अशा लोकांबाबत कठोर कारवाई सुरू केलीआहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतला असा तर पीएम किसान योजनेचे सर्व हप्ते तुम्हाला परत करावे लागतील. ज्या लोकांनी चुकीची कागदपत्रे देवून असे काम केले आहे, अशांना नोटीस पाठवून पैसे भरण्यास सांगण्यात आले आहे. तुम्ही योजनेस पात्र आहात की नाही याची पडताळणी ऑनलाईन pmkisan.gov.in या वेबसाईटवर करू शकता. जर पीएम किसान योजनेबाबत तुमच्या मनात काही शंका असतील तर अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत इमेल आयडी pmkisan-ict@gov.in वर संपर्क करू शकता. पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन नंबर- १५५२६१ या १८००११५५२६ (Toll Free) अथवा ०११-२३३८१०९२ वरही संपर्क करू शकता. जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला योजनेच्या पुढील हप्त्यात १२ वा हप्ताही पाठवला जावू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here