कोरोनापासून मोठा दिलासा, १४७ दिवसांत सर्वात कमी रुग्ण

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेची भीती सतावत असताना दिलासादायक बाब समोर आली आहे. गेल्या २४ तासात नवे रुग्ण संख्या २८,२०४ इतकी सर्वात कमी नोंदवली गेली आहे. याशिवाय दिवसभरात ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे. खूप दिवसांनी नवी रुग्णांची संख्या ३०,००० पेक्षा कमी आली आहे. सक्रिय रुग्ण संख्या १३,६८० ने कमी झाली आहे.
सध्या देशात ३,८८,५०८ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात ३ कोटी ११ लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. भारतात १४७ दिवसांनी नवी रुग्ण संख्या घटली आहे. कोरोनाचा रिकव्हरी रेट ९७.४५ वर आला आहे. अनेक अभ्यासकांनी कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट अथवा सप्टेंबरमध्ये येईल अशी शक्यता व्यक्त केली आहे. मात्र सध्या कमी होणारी रुग्ण संख्या ही खूप दिलासादायक बाब ठरली आहे.

देशात लसीकरण मोहीम गतिमान करण्यात आली आहे. तर रुग्ण संख्या घसरणीमुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमध्ये सूट देण्यात येत आहे. नियोजनबद्ध पद्धतीने शाळा, कॉलेज सुरू करण्यात येत आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here