हरियाणात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ऊस दरात १२ रुपयांची वाढ

101

चंदिगड : हरियाणा सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य सरकारने ऊस दरात १२ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आता ऊस दर प्रती क्विंटल ३६२ रुपये झाला आहे. कृषी मंत्री जे. पी. दलाल यांनी ही माहिती दिली. शुगरफेडच्या बैठकीत ऊस दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सहकार मंत्री बनवारीलाल उपस्थित होते.

शेजारच्या पंजाब राज्याने उसाच्या दरात वाढ केल्यानंतर हरियाणातही सरकारवर ऊस दरवाढीबाबत दबाव होता. शेजारच्या उत्तर प्रदेशनेही ऊसाच्या दरात वाढ केली आहे. आता हरियाणा सरकारने दरवाढ करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

दुसरीकडे हरियाणात आता कोणत्याही खत विक्रेत्यांनी खतांसोबत किटकनाशके अथवा औषधे घेण्याची सक्ती शेतकऱ्यांना केली तर संबंधित विक्रेत्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. या आदेशाचे पालन होण्यासाठी सर्व डिलर्सना पत्र पाठवले जाणार आहे. कृषी मंत्री जे. पी. दलाल यांनी गेल्या पाच खाद्य कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना हे निर्देश दिले आहेत.

कृषी मंत्र्यांनी सांगितले की डिलरांनी राज्य सरकारच्या आदेशाबाबत आपल्या विक्रेत्यांना माहिती दिली पाहिजे. अन्यथा याबाबत त्यांना परिणाम सोसावे लागतील. जे. पी. दलाल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना वेळेवर खते, औषधे आणि किटकनाशके उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक साठवणूक केली पाहिजे. गहू, मोहरी आणि बटाटा यांसह इतर पिके लक्षात घेऊन प्रत्येक गरजेच्या वस्तूंची व्यवस्था केली जाईल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here