आजमगड : ऊस विकास विभागाच्या निर्देशानंतर बागपत जिल्ह्यातील स्नेहरोड साखर कारखान्याचे मुख्य ऊस अधिकारी डॉ. शिवेंद्र सिंह ढाका, बिजनौर जिल्ह्यातील धामपूर साखर कारखान्याचे मुख्य अधिकारी राजदीप बालियान यांनी सठियाव साखर कारखान्याचे मुख्य ऊस अधिकारी डॉ. विनय प्रताप सिंह यांच्या निर्देशानंतर बुढनपूर समितीअंतर्गत ऊस खरेदी केंद्र बुढनपूर, देऊरपूर, छितौनी लोहरा, अतरौलीया, पकरडिहा, परशुरामपूर, सहादतगंज, सहदेवगंज आदी ऊस खरेद्री केंद्रांची पाहणी केली.
याबाबत लाइव्ह हिंदूस्थान डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, समितीकडून पावती मिळाल्यानंतर ७२ तासाच्या आत ऊस खरेदी केंद्रावर पुरवठा करावा. तोडणी पावती मिळाल्याशिवाय शेतकऱ्यांनी ऊस तोडू नये. ऊस हे नगदी पिक आहे. त्यापासून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगली होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना साखर कारखान्यांची साथ दिली पाहिजे. शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला साफ, ताजा ऊस पाठवून द्यावा. आजमगड जिल्ह्यात ऊस विकासाची शक्यता आहे. काही ठिकाणी उसाला तुरे आले आहेत. शेतकऱ्यांनी असा ऊस तातडीने तोडावा. कारण या उसाला उशीर झाल्यास वजन घटेल. यावेळी राजीव नयन मिश्रा, ऊस पर्यवेक्षक हरिश्चंद्र यादव,अजीत सिंह, लालमणी सोनकर आदी उपस्थित होते.