मोहिउद्दीनपूर कारखान्यात २५ ऑक्टोबरपासून गाळप

मेरठ : सरकारच्या धोरणानुसार सर्व सहकारी साखर कारखाने २५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने मेरठ जिल्ह्यातील मोहिउद्दीनपूर साखर कारखाना वेळेवर सुरू व्हावा यासाठी अधिकारी प्रयत्न करीत आहेत. अधिकाऱ्यांनी कारखान्याचे सातत्याने परीक्षण केले आहे. सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

ऊस विभागाने मोहिउद्दीनपूर कारखान्याची कामे पूर्ण करण्यासाठी टीम तयार केल्या आहेत. दुसरीकडे शेतकरीही कारखाना सुरू होण्याची वाट पाहात आहेत. कारखाना लवकर सुरू झाला, तर यंदा गव्हाची लागवडही वेळेवर करता येईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकरी सुरेंद्र यांनी सांगितले की, कारखाना वेळेवर सुरू झाल्यास अनेक प्रश्न सुटणार आहेत. तर जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार यांनी सांगितले की, कारखाना वेळेवर सुरू व्हावा यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. लवकर कारखान्याची चाचणी घेण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here