लॉकडाउनच्या काळातही ११९ साखर कारखान्यांकडून गाळप : योगी आदित्यनाथ

89

लखनौ : कोरोना महामारी आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळातही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे राज्यातील ११९ साखर कारखाने अखंडपणे सुरू राहिले. शेतकऱ्यांनी अथक परिश्रम केल्यानेच राज्यात विक्रमी ऊस उत्पादन झाले आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.
राजभवनात तीन दिवसांच्या फळे, भाजीपाला आणि फ्लॉवर शो २०२१ या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याचे उद्घाटन केले.

मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या लागवडीच्या खर्चाच्या तुलनेत किमान समर्थन मूल्य १.५ पट मिळत आहे. चार वर्षांपूर्वी आम्ही सत्तेवर आलो आणि पहिल्यांदा फळे, भाजीपाला प्रदर्शनात सहभागी झालो तेव्हा शेतकरी आणि फूल उत्पादकांनी आपल्या गरजांनुसार उत्पादनांचे प्रदर्शन केले आहे. मात्र, आता चार वर्षांनंतर गरजा आणि आवश्यकता या दोन्हींमध्ये बदल झाला आहे. पारंपरिक पद्धतीने फळे, भाजीपाला आणि फुले यांच्या उत्पादनाबरोबरच सेंद्रीय पद्धतीने उत्पादीत फळे, भाजीपाला आणि फुले प्रदर्शनामध्ये आहेत. शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सेंद्रीय शेती पद्धतीकडे वळले पाहिजे हे लक्षात ठेवावे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here