पाकिस्तान सरकारकडून निश्चित केलेल्या दराने साखर विकण्यास दुकानदारांचा नकार

97

रावळपिंडी : रावळपिंडी येथील ग्रोवर्स असोसिएशनने रावळपिंडी सरकारकडून निश्चित दरांवर साखर विकण्यास नकार दिला आहे, ज्यामध्ये सांगितले आहे की, ते सरकारच्या आदेशाला लागू करुन स्वतः नुकसान सोसू शकत नाही. रावळपिंडीचे उपायुक्त अनवारुल हक यांनी प्रति किलो साखरेची किंमत 70 रुपये निर्धारित केली होती. तर दुकानादारांकडून ती फटकारली गेली. करयाना मर्चंट असोसिएशन चे अध्यक्ष परवेंज बट यांनी सांगितले की, जेव्हा अम्ही ठोक विक्रेत्यांकडून अधिक किंमतीवर साखर खरेदी करत आहोत तर आम्हाला इतक्या स्वस्त दरांमध्ये साखर विकणे कसे परवणार.

अधिकार्‍याने सांगितले की, जर सरकारने साखरेचा पुरवठा 65 रुपये प्रति किलो निश्‍चित केला, तर सर्व ग्रोअर्स साखर 70 रुपये प्रति किलो प्रमाणे विकू शकतात. याशिवाय, केएमए ने इतर वस्तू उदा. डाळी च्या अधिक दरांनाही नाकारले आहे. पाकिस्तानात साखरेच्या मुद्द्यावरुन गोंधळ सुरु आहे. आणि हाच देशाचा मुख्य मुद्दा बनलेला आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here