ऊस पट्ट्यात वाढली बासमतीची चमक, मेरठचे प्रगतिशील शेतकरी देताहेत प्रगत वाण

मेरठ : ऊस पट्टा मानल्या जाणाऱ्या पश्चिम उत्तर प्रदेशातील मेरठ मध्ये प्रगतशील शेतकरी विनोद सैनी बासमतीची चमक दाखवत आहेत. ते स्वतः बासमतीच्या प्रगत वाणाचे उत्पादन करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहेत. शेतकरी उत्पादक संघाच्या अंतर्गत (एफपीओ) उत्तर प्रदेशसह हरियाणा, पंजाब, उत्तराखंडमध्ये शेतकऱ्यांना या बियाण्याची माहिती देऊन भात शेतीसाठी ते प्रोत्साहित करीत आहेत.

दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, कुशावली गावातील विनोद सैनी यांचे गावातच प्रोसेसिंग युनिट आहे. येथे दररोज खूप लांबवरून शेतकरी बासमती पिकाच्या विविध वाणांची माहिती घेण्यासाठी पोहोचतात. येथे त्यांनी वेअरहाऊस तयार केले आहे. शेतीमधील त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लखनौमध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला होता. आतापर्यंत त्यांनी ५०० क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना तयार करून दिले आहे. यामध्ये पुरा बासमती ११२१, पुसा बासमती १११८, पुसा बासमती १५०९, पुसा बासमती १४०१, पुसा बासमती १ आणि पुसा बासमती १६३७ या प्रगत वाणांचा समावेश आहे. सैनी यांचे बियाणे तयार करण्याचे काम महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी शेतकऱ्यांना डीएनए टेस्टेड बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न चालवले आहे. त्यांचे काम पाहून त्यांना बियाणे उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. विनोद सैनी यांनी आपल्या तालुक्यातून बासमतीची निर्यात व्हावी यासाठी प्रयत्न चालवले आहेत. यासाठी ते शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षणही देत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here