चालू आर्थिक वर्षामध्ये वृद्धी दरात घट राहणार: अर्थमंत्री निर्मला सीतारमण

66

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी सांगितले की, अर्थव्यवस्थेमध्ये आता सुधारणेचे संकेत दिसून येत आहेत. चालू आर्थिक वर्षात सकल घरगुती उत्पादन (जीडीपी) च्या वृद्धी दरात घट होईल.

त्यानी सांगितले की, 2020-21 च्या पहिल्या तिमाही मध्ये अर्थव्यवस्थेमध्ये 23.9 टक्क्याची जबरदस्त घट आली आहे, ज्यामुळे पूर्ण आर्थिक वर्षादरम्यान जीडीपी चा वृद्धी दर नकारात्मक किंवा शून्य राहील.

सेरा वीक च्या भारत उर्जा मंचाला संबोधित करताना अर्थ मंत्री म्हणाल्या की, सरकारने कोरोना महामारीमुळे 25 मार्चपासून कडक लॉकडाउन लागू केला होता. लॉकडाउन मुळे आम्ही कोरोनाशी निपटण्यासाठी तयारी करु शकलो.

त्या पुढे म्हणाल्या की, आर्थिक हालचाली सुरु होण्याबरोबरच आर्थिक संकेतांमध्ये सुधारणा दिसून येत आहेत. सणासुदीच्या हंगामापासून अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळण्याची आशा आहे. यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या आणि चौथ्या तिमाहीमध्ये वृद्धी दर सकारात्मक राहण्याची आशा आहे. त्यांनी सांगितले की, एकूण 2020-21 मध्ये जीडीपी चा वृद्धी दर नकारात्मक किंवा शून्याच्या जवळपास राहील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here