सप्टेंबर महिन्यात जीएसटी करवसूली १.१७ लाख कोटींवर

84

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून अर्थव्यवस्था सावरत असताना जीएसटी करवसुलीतही गती आली आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यात जीएसटी करवसूली १.१७ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ टक्के जादा जीएसटी करवसूली झाली आहे.

कोरोनाच्या फटक्याने यंदा जून महिन्यापर्यंत जीएसटी वसुली एक लाख कोटी रुपयांपेक्षा कमी झाली होती. त्याआधी सलग नऊ महिने जीएसटी वसुली एक लाख कोटी रुपयांवर गेली होती. आता पुन्हा जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जीएसटी करवसूली एक लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सरासरी जीएसटी १.१५ लाख कोटी रुपये राहिली. तर पहिल्या तिमाहीत १.१० लाख कोटी रुपयांच्या आसपास करवसुली झाली आहे.
यावर्षी ऑगस्ट महिन्यात एकूण जीएसटी महसूल १,१७०१० कोटी रुपये झाला. त्यामध्ये सीजीएसटी २०,५७८ कोटी रुपये आणि एसजीएसटी २६,७६७ कोटी रुपये अशी विभागणी आहे. तर आयजीएसटी ६०,९११ कोटी रुपये, इतर उपकर ८७५४ कोटी रुपये जमा झाले. आयजीएसटीमध्ये आयातीवर २९,५५५ कोटी रुपये जीएसटी वसुली झाली आहे. तर इतर उपकरात आयातीवर ६२३ कोटी रुपये जीएसटीचा समावेश आहे.

सरकारने सीजीएसटीमध्ये २८८१२ कोटी रुपये दिले आहेत. तर एसजीएसटीमध्ये २४,१४० कोटी रुपयांचा समावेश आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here