नवी दिल्ली : एप्रिल महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कलेक्शन १.६८ लाख कोटी रुपयांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचल्याचे अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे. देशातील आर्थिक व्यवहारांमत सुधारणा दिसून आली आहे. एप्रिल महिन्याचे कलेक्शन १.४२ लाख कोटींच्या तुलनेत २५,००० कोटी रुपयांनी अधिक आहे.
एप्रिल महिन्यात सकल जीएसटी महसूल १,६७,५४० कोटी रुपये मिळाला आहे. यामध्ये केंद्रीय जीएसटी ३३,१५९ कोटी रुपये, राज्य जीएसटी ४१,७९३ कोटी रुपये एकीकृत जीएसटी ८१,९३९ कोटी रुपये आणि उपकर (मालाच्या आयातीवर एकत्र केलेल्या ८५७ कोटी रुपयांसह १०,६४९ कोटी रुपये आहे.
मंत्रालयाने सांगितले की, एप्रिल महिन्यातील महसूल गेल्या वर्षी याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा २० टक्क्यांनी अधिक आहे. मंत्रालयाने सांगितले की, पहिल्यांदाच सकल जीएसटीने १.५ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. मार्च २०२२ मध्येई-वे बिलांची संख्या ७.७ कोटी होती, जी फेब्रुवारी २०२२ महिन्याच्या ६.८ कोटी ई-वे बिलांच्या तुलनेत १३ टक्क्यांनी अधिक आहे. यातून व्यावसायिक घडामोडीतील तेजी दिसून येते.